सांगली अॅम्बुलन्स आणि ट्रकच्या सामोरा समोर झालेल्या अपघातात अॅम्बुलन्सचा अक्षरशः चुराडा झाला.
यात दोघांचा मृत्यू झाला. सांगली इस्लामपूर रस्त्यावर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती.
त्यामुळे अॅम्बुलन्स आणि गुजरातला पोत्याचे बारदाने घेऊन जाणाऱ्या ट्रकचा सामोरा समोर अपघात झाला.
सांगली-इस्लामपूर रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाबाजूचा जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.
सांगलीहून इस्लामपूरकडे एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे इस्लामपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला रुग्णवाहिकेने समोरून जोरात धडक दिली.ही धडक इतक्या जोरात होती की रूग्णवाहिका धडकल्यानंतर बाजूच्या डिव्हायडरवर जावून धडकली.
यामध्ये अॅम्बुलन्सचा चालक सनी राठोड आणि अरुण कांबळे हे दोघे जागीच ठार झाले आहेत.