अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- व्यसनाधीश व्यक्ती आपल्या व्यसनाची हौस भागविण्यासाठी कोणत्याही ठरला जायला पुढे मागे बघत नाही. कारण आमच्या पोटात दारू आम्ही काहीही करू.
असाच एका बेवड्याने दारूसाठी पैसे न मिळाल्याच्या रागातून चक्क गाडीची काच फोडून गाडीतील रक्कम चोरल्याची घटना पारनेरमध्ये घडली आहे.
या घटनेविरोधात फिर्यादी गाडीमालक सतीश कारखेले ( रा. राळेगण थेरपाळ) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना राळेगण थेपाळ येथे एक नोव्हेंबर रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत उर्फ अण्णा किसन कारखिले (रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर) यास 31 ऑक्टोंबर रोजी
त्याने दारू पिण्यास पैसे मागितले असता दिले नसल्याचा राग मनात धरुन सतीश कारखेले यांच्या कारचे दरवाजाचे नुकसान करून मागील काच फोडली.
तसेच शिवीगाळ करीत जिवेमारण्याची धमकी दिली. त्यानंतर गाडीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये रोख व गाडीचे कागदपत्र चोरून नेले असल्याची फिर्याद सतीश कारखिले यांनी म्हंटले आहे.
दरम्यान पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved