श्रीरामपूर गोळीबारप्रकरणी दोन महिलांना अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर ;- बुधवारी हुसेननगर भागात झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या आगोदर दोन जणांना अटक केल्याने आरोपींची संख्या चार झाली आहे.

हुसेननगर भागात शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात असलेल्या परस्पर विरोधी तक्रारीनंतर झालेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत.

जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी शेख रफद शेख रशीद (वय २६, रा. औरंगाबाद), सय्यद मुजीब सय्यद मैनोद्दिन (वय ३२, पढेगाव, ता. जि. औरंगाबाद) यांना अटक केली होती.

आता त्यातीलच मेहरुनिसा शेख, रुही शेख या दोन महिलांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24