भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- अंबड शहराजवळ असलेल्या सोमाणी जिनिंग व सदगुरु हाँटेलनजीक ट्रक आणि टेम्पोंची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात टेम्पो चालकासह इतर एक जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार  (दि.४) डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या दरम्यान घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी कि अंबडहून जालन्या कडे जाणारा मालवाहू (ट्रक क्रमांक) (टि.एन् २३ सी.व्ही २४८९ व पंतजली दुधाची वाहतूक करणारा (टेम्पों क्रमांक) एम.एच ०४,५९०६ या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली धडक इतकी भिषण होती की दोन्ही वाहने एकमेकांत अडकल्याने टेम्पोंतील दोन्ही मृतदेह जेसीबीने वाहने बाजुला करुन कटरच्या साह्याने कापून काढण्यात आली.

मृतदेह काढण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तास लागले. अपघाताची माहिती मिळताच शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेवुन गर्दी केली होती शहरातील जाकेर डावरगांवकर सह इतर नागरिकांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी घटनास्थळी डि.वाय.एस.पी देशपांडे,

अंबड पोलिस ठाण्याचे स.पो.नि.पंतगे,पी.एस.आय चाटे पोलीस कर्मचारी महेंद्र गायके,सतीश देशमुख सह महामार्ग पोलीस जालना यांनी भेट देवून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केली.

या अपघातातील मयत( टेम्पोंतील) सुमित भाऊसाहेब दुशिंग( वय२५) व  अमोल आल्हाट (वय २७) रा.नेवासा फाटा जि.अहमदनगर येथील असुन ते पतजंली दुध नेवासा फाटा येथून जालना येथे डिलीव्हरी देत असल्याची माहीती सुत्रांकडुन देण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24