उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोमय्या यांनी नाईक परिवाराशी असलेल्या आर्थिक संबंधाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत.ते का लपवण्यात आले ? रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अन्वय नाईक व उध्दव ठाकरे परिवाराचे २१ सातबारा उतारे समोर आले आहेत. तसेचं रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांचा या जमीन घेण्यामागे उद्दिष्ट काय आहे?

असाही प्रश्न केला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना या जमीन प्रकरणाची माहितीच नाही असं सोमय्या यांनी सांगितलं आहे.

नाईक परिवाराचे उध्दव ठाकरे परिवाराशी यांचे एवढे घनिष्ठ संबंध, व्यक्तिगत संबंध, आर्थिक संबंध, व्यावसायिक या संबंधांबाबत स्पष्टता येणे गरजेचे असं ही त्यांनी पत्रकारपरिषदत म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी या सर्व जमीन खरेदी प्रकरणात जमीन कशासाठी घेण्यात आल्या, शेतीसाठी, व्यवसायासाठी की गुंतवणुकीसाठी याचा खुलासा करावा असाही प्रश्न सोमय्या यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24