ज्या निलेश लंकेंची सेनेतुन हकालपट्टी केली त्यांच्याच मताने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज (शनिवार) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरीक्षा असणार होती.

दुपारी २ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरात ही चाचणी पार पडली आणि या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहिले.

Ahmednagar Live 24 च्या लाईव्ह च्या बातम्या मिळवण्यासाठी 9405799389 हा नंबर तुमच्या व्हाट्सअप गृप ला ॲड करा

सरकारला १६९ आमदारांनी समर्थन दिले, तर ४ आमदार तटस्थ राहिले. भाजपच्या सर्व आमदारांनी यावेळी सभात्याग केल्याने विरोधात शून्य मतदान झाले.

दरम्यान विश्वासदर्शक ठरावा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ज्या निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली त्यांच्याच एका मताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बहुमत गाठू शकले आहे 

आमदार लंके यांनी विश्वासदर्शक ठराव सुरु असताना त्यांचे १४५ वे अमुल्य मत महाविकास आघाडीच्या बाजूने करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला. महाविकास आघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे. बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहिले आहेत.

अहमदनगर Live 24 च्या टेलिग्राम channel ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

जॉईन टेलिग्राम channel 

व भाजपाने सभात्याग केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारची आज शक्तिपरीक्षा होती. या बहुमत चाचणीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास झाले आहेत.

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24