अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेले नेवाश्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी नगर शहरातील शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन शिवसेना उपनेते अनिलभैय्या राठोड यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली.
यावेळी ना.गडाख यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेत शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेले ना.शंकरराव गडाख यांनी नगर शहरातील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या शिवालयास भेट दिली.
यावेळी ना. गडाख यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असला तरी जिल्ह्यात मात्र शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने शिवसेनेच्या कोट्यातून नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांना मंत्रिपद देण्यात आले.सरकार स्थापनेपूर्वी आ.गडाख यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
नगरमध्ये शिवसेनेच्यावतीने ना.गडाख यांचे जंगी स्वागत करण्यात आले.या सत्कारानंतर ना.गडाख व राठोड यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.ना.गडाख यांनी शिवालयास भेट दिल्यामुळे शिवसेनेमध्ये उत्साह संचारला आहे.
नगरला गेल्यानंतर शिवसेनेच्या कार्यालयात जाऊन या,शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची भेट घ्या. असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ना.गडाख यांना सांगितल्याचे समजते.अशी चर्चा ना.गडाख यांनी शिवालयाला भेट देऊन गेल्यानंतर सुरु होती. ना.गडाख यांच्या भेटीमुळे अनिलभैया राठोड विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.