बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक २०२५ साली उभारणार – उद्धव ठाकरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक उभारणार आहोत, हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल.

त्यात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असे भव्यदिव्य स्मारक २०२५ साली उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

औरंगाबादमधील पाणीपुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मला लाड नको, मला तुमचे आशीर्वाद हवेत. रस्त्यात खड्डे आहेत मान्य आहे.

पण हे सगळे गुळगुळीत करायचे आहेत. पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केलं, पण न सांगता न बोलता कामाची पाहणी करायला येईन, शेतकरी उद्ध्वस्त झाला तेव्हा त्यांना मोठी मदत केली.

नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग 1 मेपर्यंत सुरू करणार आहोत. महामार्ग झाल्यानंतर संभाजीनगरचा वेगाने विकास होणार आहे.

विमानतळाचे आपण नाव बदललं तर रहदारी वाढेल, उद्योग येत आहेत. मला आता कामं करण्याची घाई आहे, इतके दिवस मला या शहराने खूप दिलं, मला आता कामं करायची घाई आहे. भूमिपूजन झालं, कुदळ मारली इथे कामं संपलं नाही.

निवडणुका आल्या म्हणून काय कामं करायची नाहीत का?, हातात घेतलेलं कामं पूर्ण करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24