अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत.राज्यामधील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि अनलॉक संदर्भात मुख्यमंत्री बोलतील.
अधिवेशन कार्यकाळात सरकारकडून मंजूर करण्यात आलेली कामे,कायदे आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवरही ते जनतेशी संवाद साधतील असं कळतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अविभाज्य घटक असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली.
त्यामुळे कोरोनाच्या फैलावाला अटकाव घालायची खबरदारी बाळगावी असं आवाहनही मुख्यमंत्री करतील.कोरोनाचा धोका राज्याला संभवलेला असताना राजकीय वातावरण तापलेला पाहायला मिळालं. दरवेळी विरोधकांकडून महाविकास आघाडी आणि शिवसेनेला टार्गेट करण्यात आलय.
मुंबई कारशेडचं मुद्दा असो किंवा नागरिकांना लाईट बिळात न मिळालेली सवलत यावरही महविकास आघाडी टार्गेट केली गेली..सोनिया गांधींनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे.
यासह बऱ्याच गोष्टींवर उद्धव ठाकरे नागरिकांशी चर्चा करतील. कोरोना कालावधीत मुख्यमंत्री सातत्याने जनतेशी बोलत असल्याचे आपण पाहिलय.