राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने जाहिर पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. ‘शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगतानाच मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाच्या अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन आल्यानंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मुर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतला आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना कुणाला पाठिंबा देणार, याविषयी सगळीकडेच चर्चा सुरु होत्या. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी खासदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असल्याच्या बातम्या येत होत्या. पण मी नम्रपणे सांगू इच्छितो की राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांनी माझ्यावर कोणताही दबाव आणला नाही, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

मला आदिवासी समाजातील अनेक कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे फोन आले. विशेष करुन शिवसेनेतील आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी, शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्यासाठी मला विनंती केली. प्रेमाच्या आग्रहाखातर अखेर आम्ही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यचाा निर्णय घेतला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.