शासनाच्या जमिनीवर पुढाऱ्याने अनधिकृतपणे केले बांधकाम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात अतिक्रमण हि एक जटिल समस्या बनते आहे. ठिकठिकाणी अनधिकृतपणे जमिनी बळकावून तिथे  अतिक्रमण करण्याचे  प्रमाण आजकाल वाढत आहे.

यावर अनेकदा कारवाई केली जाते, मात्र आता खुद्द एका राजकीय पुढाऱ्यानेच शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. श्रीगोंदा तालुक्यामधील बेलवंडी येथील एका मोठया राजकीय नेतेने शासकीय जागेत अतिक्रमणं केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अष्टविनायक महामार्गावरील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या असलेल्या शासनाच्या जागेत गावातील एका राजकीय पुढाऱ्याने अतिक्रमणं केलं आहे.

या पुढाऱ्याने एका रात्रीत सुमारे ८ व्यापारी गाळे तयार करुन शासनाच्या लाखो रुपयांच्या जमिनीवर डल्ला मारला आहे. या बाबत दिनेश मुनोत, मधुकर कन्हेरकर यांनी महसूल विभागाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभाग,ग्रामपंचायत कार्यालय बेलवंडी यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली आहे.

दरम्यान या पुढाऱ्यावर अद्यापही कोणतीही कारवाई केली नसल्याने संबंधीत पुढाऱ्यावर कोणत्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद तर नाही ना ? अशी चर्चा रंगू लागली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24