त्या कारवाईअंतर्गत पोलिसांनी जप्त केला 45 लाखांचा मुद्देमाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-   जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक धोरण अंगीकारले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील एका तालुक्यात पोलिसांनी अशीच कारवाई करत तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की,

राहुरी तालुक्यातील मांजरी येथे गट नंबर 618 मधील शेतजमिनीतील शासनाच्या मालकीची माती विनापरवाना, बेकायदा उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख,

उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी पथकासह घटनास्थळी छापा घातला. पोलिसांना पाहताच संशयित पसार झाले. दरम्यान पोलिसांनी घटनस्थळावरून एक जेसीबी, चार ट्रॅक्‍टर, असा 45 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी कॉन्स्टेबल श्रीकृष्ण केकाण यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध पर्यावरण संरक्षण व शेतातील माती काढून टाकण्याच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल :- संदीप एकनाथ विटनोर (रा. मांजरी), आशीर लालाभाई शेख (रा. पिंप्री वळण), सुनील दादा जंगले, ज्ञानेश्वर रखमाजी कंक, नवनाथ ज्ञानेश्वर जंगले,

जिजाबाई वसंत जंगले (चौघेही रा. पानेगाव, ता. नेवासे), मोहंमद शेख (रा. खेडले परमानंद, ता. नेवासे), जनार्दन गागरे (पूर्ण नाव पत्ता समजला नाही) अशी गुन्हा नोंदविलेल्यांची नावे आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24