मुंबई देशात कोरोना व्हायरस उग्र रूप धारण करत आहे. महाराष्ट्र राज्यात याचे प्रमाण लक्षणीय आहे. यात प्रशासन व पोलीस कर्मचारी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
परंतु आता यांनाच कोरोनाचा धोका भेडसावत आहे. कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे.
ते शिवडी पोलीस स्टेशन इथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली.
त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 1 हजार 7 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.
धक्कादायक बाबा म्हणजे यामध्ये सर्वाधिक 400 पोलीस हे मुंबईतील असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर, नाशिक आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.