दुर्दैवी घटना! शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- विजेचा शॉक लागून एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.२१ ) कर्जुले पठार उपकेंद्र (ता. संगमनेर ) या ठिकाणी घडली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे महावितरणचे उपकेंद्र आहे.

या उपकेंद्रात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे येथील कंत्राटी कर्मचारी सोपान भावका कुलाळ (वय २९) रा.जवळे बाळेश्वर (ता.संगमनेर) हे काम करत असताना विजेच्या तारेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेमुळे परिसरात व वीज वितरण कंपनीच्या कर्जुले पठार कार्यालयात खळबळ उडाली आहे .

दरम्यान, महावितरणचे शाखा घारगाव येथील कनिष्ठ अभियंता आशिष अरविंद रणदिवे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24