अनोखे पूजन! बियाण्यांची पूजा म्हणजेच लक्ष्मीची पूजा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-जिवापाड जपलेले बियाणे हेच शेतकर्‍यांसाठी लक्ष्मीचे रूप आहे व त्याची पूजा आणि संवर्धन केल्यानेच माझा गरीब शेतकरी राजा सुखी होऊ शकतो.

बियाण्यांची पूजा म्हणजेच लक्ष्मीची पूजा या विचारांना स्वीकारत पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या बीज बँकेत पतीसह आणि नातवानंसह विधिवत पूजा केली.

त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की यानिमित्ताने पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांचे आणखी एक रूप जगासमोर येण्यास मदत झालेली आहे. राहीबाई सोमा पोपेरे यांच्या बँकेत शेकडो प्रकारचे पारंपारिक बियाणे संवर्धित केलेले आहेत.

याच बियाण्यांनी त्यांना देश आणि विदेशात प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे.बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मदतीने त्या दिवस-रात्र बियाणे संवर्धन ,वृद्धी आणि वितरण या विषयासाठी कार्यरत आहेत.

गावरान व देशी बियाणे यांनाच आपले जीवन मानलेल्या राहीबाई यांनी बियाने संवर्धन हेच आपले अंतिम कार्य असून त्यासाठी आपण समर्पित असल्याचे स्पष्ट केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24