शिर्डी :- परिसरात गुन्हे करणाऱ्या दोघांना पोलिसांना गजाआड करण्यात यश मिळाले. या वेळी चौघे जण फरार होण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, चाकू, दोरी, मिरची पूड, मोटारसायकल असा सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राहाता न्यायालयाने दोघांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
अंकुश पवार याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे, दोरी, मोटारसायकल तसेच सुनील साबळे याच्याकडून माेटारसायकल, चाकू, मिरचीची पूड असा २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.