अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- पुण्यात दांडेकल पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपजवळ थांबलेल्या एका अल्पवयीन मुलाला फरफटत ओढत सार्वजनिक स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शुक्रवारी भरदुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सागर पोपट सोनवणे (वय २१, रा. दांडेकर पुल) याला अटक केली आहे. याबाबत १६ वर्षीय मुलाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगा व त्याचा एक मित्र दांडेकर पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपवर थांबले होते. त्यावेळी तोंडओळखीचा आरोपी सागर सोनवणे हा तेथे आला.
त्याने मुलाला फरफटत ओढत येथे असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात नेले. त्याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. दरम्यान,
या प्रकारानंतर पीडित मुलगा घाबरला होता. त्याने पोलिसांकडे धाव घेऊन याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत सागर याला अटक केली आहे