अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :कोरोनासंदर्भात उपाययोजना राबविण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे.
राज्यात कोरोनासंदर्भातील उपाययोजना अंमलबजावणीचा पुरता बोऱ्या उडाला आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे जनतेचा नाहक बळी जात असल्याची घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकावर केली आहे.
आज जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते दरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थिती व निसर्ग चक्रीवादळ नुकसानीचा आढावा घेतला.
त्यानंतर दुपारी शासकीय विश्रामगृह येथे दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका ताई राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews