आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने धनुष्यबाण या चिन्हावर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या जाणार आहेत. राहुरी तालुक्यात तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे यांच्या कामामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पहावयास मिळत आहे. शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागावे, असे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

बुधवार दि. २३ रोजी शिवसेना पक्षाचे जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे हे राहुरी दौऱ्यावर आले होते. व्यंकटेश लॉन्स येथे शिवसेना राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी दत्तात्रय दळवी, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, दक्षिण जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब म्हसे, जयवंत पवार, अनंतराव शेळके, शशिकांत दिवटे, राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, तालुका संघटक महेंद्र उगले, तालुका संपर्कप्रमुख अशोक तनपुरे, अध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख संपत जाधव, तालुका उपप्रमुख प्रशांत खाळेकर, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख किशोर मोरे, शहर प्रमुख गंगाधर सांगले उपस्थित होते.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना निरीक्षक प्रशांत काळे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राहुरी तालुक्याचा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष बैठक घेत आहोत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून घेतलेले निर्णय व त्या निर्णयांची शासकीय स्तरावर झालेली अंमलबजावणी याची माहिती घेतली जात आहे. तसेच शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्वत्र बैठका घेतल्या जात आहेत, असे काळे यांनी सांगितले.