UPI Transaction : मार्च महिना संपण्यासाठी 2 दिवस बाकी आहेत. अशा वेळी 1 एप्रिलपासून तुमच्या खिशावर चांगलाच परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जर तुम्ही UPI पेमेंट्सद्वारे व्यवहार करत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण आता 1 एप्रिलपासून तुमच्या ऑनलाईन व्यवहारात बदल होणार आहे. यामुळे तुम्हाला अधिक चार्ज पडू शकतो.
याबाबत NPCI ने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून अतिरिक्त शुल्क आकारण्याचे संकेत दिले आहेत. हे शुल्क 0.5- 1.1 टक्के आकारले जाऊ शकते. परिपत्रकात UPI द्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI जारी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
किती शुल्क आकारले जाईल?
मंगळवारी जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, NPCI ने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI सादर करण्याची तयारी केली आहे. हे शुल्क 0.5- 1.1 टक्के लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.
परिपत्रकात, UPI द्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI सूचना जारी करण्यात आली आहे. हे शुल्क वापरकर्त्याला व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागेल.
सुमारे 70% व्यवहार रुपये 2000 पेक्षा जास्त आहेत
NPCI च्या परिपत्रकातून असे संकेत मिळतात की 1 एप्रिलपासून तुम्ही UPI पेमेंट म्हणजेच Google Pay, Phone Pay आणि Paytm सारख्या डिजिटल माध्यमातून 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास तुमच्याकडून रुपये आकारले जातील.
अहवालानुसार, UPI P2M व्यवहारांपैकी सुमारे 70 टक्के व्यवहार 2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आहेत, अशा परिस्थितीत 0.5 ते 1.1 टक्के करण्याची तयारी आहे.
30 सप्टेंबरपूर्वी पुनरावलोकन केले जाणार
इंटरचेंज फी सामान्यतः कार्ड पेमेंटशी संबंधित असते आणि व्यवहार स्वीकारण्यासाठी आणि खर्च कव्हर करण्यासाठी लागू केली जाते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की 1 एप्रिलपासून हा नवीन नियम लागू केल्यानंतर 30 सप्टेंबर 2023 पूर्वी त्याचे पुनरावलोकन केले जाईल.
कोणाकडून इंटरचेंज शुल्क आकारले जाणार नाही?
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे इंटरचेंज शुल्क सेट केले आहे. शेती आणि दूरसंचार क्षेत्रात सर्वात कमी इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. वास्तविक, इंटरचेंज शुल्क फक्त त्या वापरकर्त्यांना भरावे लागेल जे व्यापारी व्यवहार करतात.
दरम्यान, या परिपत्रकानुसार, पीअर-टू-पीअर (पी2पी) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (पी2पीएम) मधील बँक खाते आणि पीपीआय वॉलेटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.