UPI Update : जर तुम्ही Paytm, GPay सारखी PhonePe आणि UPI पेमेंट अॅप्स भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. या ॲप मधून जितक्या सहजतेने व्यवहार होत असतात. तितकाच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा धोकाही वाढतो. अशा स्थिती मध्ये काही गोष्टींची आपण काळजी घेणे आवश्यक आहे.
1) आपला पिन कधी कोणाशीही शेअर करू नका
आपण UPI पेमेंटसाठी वापरत असलेला 6 किंवा 4 अंकी पिन कोणासोबत शेअर करू नका.
कारण प्रत्येक व्यवहार करण्यासाठी तो उपयोगी येतो.
त्यातून आपली फसवणूक देखील होऊ शकते.
2) आपल्या फोनवर शक्यतो स्क्रीन लॉक ठेवा
आपल्या फोन मधील इतर अॅप्सच्या तुलनेत UPI आधारित असलेले पेमेंट अॅप्स हे लॉक करणे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत या व्यवहारांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची असते.
3) कोणताही व्यवहार करण्या अगोदर UPI आयडी खात्रीपूर्वक तपासा
नेहमी कोणताही व्यवहार करण्या अगोदर आपण UPI आयडी नीट तपासावा.
कारण, आपण असे न केल्यास, आपल्याकडून कोणत्याही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होऊ शकतात.
4) कधीही संशयास्पद असणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका
अशा बऱ्याच वेळा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्या मध्ये आपल्याला पेमेंटसाठी, काही ऑफर बद्दल लिंक पाठवली जाते.
तसेच त्या लिंकवर आपल्याला क्लिक करण्यास सांगितले जाते. असे करून हॅकर्स आपला फोन हॅक करतात.
आपला फोन हॅक केल्यानंतर एंटर केलेला फोनचा पिन सुद्धा रेकॉर्ड करता येतो.
5) दोन पेक्षा जास्त ॲप वापरणे टाळा
नेहमी दोन अधिक UPI अॅप्स वापरू नका. कारण, असे केल्याने आपला गोंधळ होऊ शकतो. यामुळे आपले अकाउंट हॅक देखील होऊ शकते.