महाराष्ट्र

UPSC Interview Questions : भारतीय राज्यघटनेचा रक्षणकर्ता असे कोणाला म्हणतात?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही देशातील लाखो तरुणांची इच्छा असते. पण तीन टप्पे पूर्ण न करता आल्याने अनेकांची ही इच्छाच बनून राहते.

या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची क्वचितच कोणाला कल्पना असेल. यूपीएससी म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

जिथे प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा सब्जेक्टिव्ह आणि मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता वाढते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते.

या परीक्षेत किंवा मुलाखतीत असे अनेक विचारले जातात ज्यामुळे उमेदवार बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत, ज्याची उत्तरे तुम्हाला येतात का हे नक्की तपासून पाहा.

प्रश्न : शून्य वनक्षेत्र असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?
उत्तर : चंदीगड

प्रश्न : भारतामध्ये आत्तापर्यंत किती वेळा सार्वजनिक निवडणूका झाल्या आहेत?
उत्तर : १७ वेळा

प्रश्न : भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे?
उत्तर : तुर्भे या ठिकाणी

प्रश्न : भारतीय राज्यघटनेचा रक्षणकर्ता असे कोणाला म्हणतात?
उत्तर : सर्वोच्च न्यायालय

प्रश्न : महाबळेश्वर ते पोलादपूर या दरम्यान कोणता घाट लागत असतो?
उत्तर : आंबेनळी घाट

प्रश्न : अहमदनगरमध्ये कोणते स्थान साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर : शिवाजी नगर, गणेश नगर, गौतम नगर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office