UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खास आहे. कारण या बातमीत आम्ही काही महत्वाचे प्रश्न दिले आहेत, ज्याची उत्तर तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत.
प्रश्न : भारतात पहिला गणतंत्र दिवस कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर : 26 जानेवारी 1950 रोजी भारतात पहिला गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला आहे.
प्रश्न : भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हणतात?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न : भारतात किती राष्ट्रीय सण साजरे केले जातात?
उत्तर : 3 सण
प्रश्न : भारताचे संविधान लिहायला किती वेळ लागला होता?
उत्तर : 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा वेळ भारताचे संविधान लिहायला लागला होता.
प्रश्न : वर्ष 2023 हा भारताचा कितवा प्रजासत्ताक दिवस आहे?
उत्तर : 74 वा प्रजासत्ताक दिवस आहे.
प्रश्न : जगातील सर्वात मोठा लोकतांत्रिक देश कोणता आहे?
उत्तर : भारत