अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी जी विकास कामे मार्गी लावता येणे शक्य आहे. ते सर्व प्रश्न येत्या काळात मार्गी लावले जातील, असे आश्वासन राज्याचे नगरविकास, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
परिवर्तन आघाडीचे नेते व तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या निवासस्थानी राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा परिवर्तन आघाडी तसेच रावसाहेब चाचा मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी विलास रामदास धुमाळ, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, नगरसेवक शहाजी जाधव, सोन्याबापू जगधने, माजी नगरसेवक नितीन तनपुरे, डॉ. धनंजय मेहेत्रे, राजेंद्र उंडे आदी प्रमुख उपस्थित होते.
ना. प्राजक्त तनपुरे म्हणाले की, राहुरी तालुक्याला अनेक वर्षांनंतर मंत्रीपद मिळाले असून, त्याचा वापर शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी केला जाईल.
मग त्यात ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असो, एसटी बसस्थानकाचा प्रश्न असो ते सर्व प्रश्न मार्गी लावू. तसेच शहराची २९ कोटी रुपयांच्या सुधारित पाणी योजनेस युती सरकारच्या काळात जी तत्वता मान्यता मिळाली होती.
त्याबाबत आजच मंत्रालयात बैठक होऊन त्यास नियमित मंजुरी मिळाली असून, सदर कामही लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.