महाराष्ट्र

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : भाजपचे पंकज सिंह यांचा दणक्यात विजय, विक्रमी फरकाने नाव उमटवले

Published by
Ahmednagarlive24 Office

नोएडा : उत्तर प्रदेश, उत्तराखंड (Uttar Pradesh), पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. पण मतमोजणीच्या कलांनुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने (Bjp) जोरदार मुसंडी मारली आहे.

नोएडा (Noida) विधानसभा मतदारसंघात भाजपचे पंकज सिंह (Pankaj Singh) यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी (Sunil Chaudhar), बसपचे कृपाराम शर्मा आणि काँग्रेसचे पंखुरी पाठक यांच्यात लढत होती.

यामध्ये भारतीय जनता पार्टीचे (BJP) उमेदवार पंकज सिंह (Pankaj Singh) यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा विधानसभा जागा सुमारे १ लाख ८० हजारांच्या विक्रमी फरकाने जिंकली आहे.

पंकज सिंह यांचा हा विजय सर्वात मोठा मानला जात आहे. कारण त्यांनी विक्रमी फरक ठेवून ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे त्यांनी रेकॉर्ड बनवला आहे.

नोएडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांना ७०. ८३ टक्के मते मिळाली आहेत. त्या तुलनेत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला केवळ १६. ८४ टक्के, बसपाच्या उमेदवाराला ५.०१ आणि काँग्रेसच्या उमेदवाराला ३.९७ टक्के मते मिळाली आहेत.

Ahmednagarlive24 Office