Vande Bharat Express : आता महाराष्ट्रातील जनतेला तिरुपतीचे दर्शन घेणे होणार सोपे ! सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Vande Bharat Express : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात विविध चर्चा पाहायला मिळत आहेत. या गाडीचा सध्या मोठा बोलबाला आहे. या ट्रेनची भुरळ अनेकांना पडली आहे. लहानग्यापासून ते थोरा-मोठ्यापर्यंत सर्वांना आता या गाडीने प्रवास करायचा आहे. कारण की, या गाडीमध्ये वर्ड क्लास फॅसिलिटी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या गाडीचा स्पीड हा सर्वाधिक आहे. ही ट्रेन तब्बल 180 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. मात्र असे असले तरी या गाडीला 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे या गाडीने जलद आणि आरामदायी प्रवास प्रवाशांना करता येत आहे.

2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी प्रवाशांच्या पसंतीस अल्पावधीतच खरी उतरली आहे. म्हणून भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू केली जात आहे. आतापर्यंत देशातील 17 मार्गांवर ही ट्रेन सुरू झाली असून 26 जून रोजी देशात नव्याने पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत.

एकाच वेळी पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची ही पहिलीच वेळ राहणार आहे. मुंबई-मडगाव, बंगळुरु-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदोर, भोपाळ जबलपूर या पाच मार्गावर 26 जून रोजी वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. तसेच, नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून ही गाडी सुरू केली जाणार आहे. या दोन शहरांमधील 581 किलोमीटरचे अंतर या ट्रेनमुळे वेगाने पार करता येणार आहे. सध्या या दोन्ही शहरांमधील अंतर पार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या एक्सप्रेसने दहा तासांचा कालावधी लागतो. मात्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर या दोन्ही शहरांमधील अंतर केवळ सहा तासात पूर्ण होणार आहे.

ही ट्रेन या मार्गावरील सर्व महत्त्वाच्या शहरांना कनेक्ट करणार आहे. यामध्ये अदिलाबाद, करीमनगर, वारंगळ या शहरांसह महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही सुपरफास्ट ट्रेन काझीपेठ, रामगुन्दम, सिरपूर आणि इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

वंदे भारतमुळे तिरुपतीचे दर्शन घेणे होणार सोपे
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूरकरांना सिकंदराबाद पर्यंतचा प्रवास जलद गतीने करता येणार आहे. शिवाय सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. यामुळे नागपूरकरांना नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसने सिकंदराबाद पर्यंतचा आणि त्यापुढे सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसने थेट तिरुपती पर्यंतचा प्रवास करणे सोयीचे होणार आहे. एकंदरीत या ट्रेनमुळे नागपूरकरांचे तिरुपतीचे दर्शन सोपे होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24