पालखी सोहळ्यात घुसला जेसीबी,नामदेव महाराजांचे वंशज जागीच ठार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे :- कार्तिकी वारीसाठी पंढरपुरहून आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यात जेसिबी (JCB) मशीन घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. जेसिबीचा ब्रेक फेल झाल्याने ते दिंडीत घुसले. दोन वारकरी चिरडून जागीच ठार झाले.मंगळवारी सकाळी 8.30 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. 

यात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36 वर्षे) यांच्यासह अतुल महाराज आळशी (वय 24 वर्षे) या वारकऱ्याचा मृत्यू झाला तर 15 वारकरी जखमी झाले आहेत.

पंढरपूर ते आळंदी वारी करणाऱ्या दिंडीला सासवड जवळील दिवे घाटातमध्ये अपघात झाला. दिंडीमध्ये जेसीबी घुसल्याने ही दुर्घटना घडली. या भीषण अपघातात 2 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना हडपसर येथील नोबेल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

संजीवन समाधी सोहळ्यापूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकाला ताब्यात घेतलं आहे.

सोपान महाराज नामदास हे संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज आहेत.या अपघाताने वारकरी संप्रदायावर मोठं संकट ओढावलं आहे. असं असलं तरी वारकरी संप्रदाय नियमांप्रमाणे चालणारा पंथ आहे, असंही बंडा तात्या कराडकर यांनी नमूद केलं.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24