महाराष्ट्र

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; आजपासून रॅली, मोर्चे काढण्यास बंदी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  मुंबईमध्ये आज मध्यरात्रीपासून कडक नियम लागू करण्यात आले आहे. मुंबईमध्ये पुढील 12 तारखेपर्यंत शहरात रॅली, मोर्चे किंवा कोणतेही आंदोलन करता येणार नाही, याबद्दल मुंबई पोलिसांनी नवे आदेश जारी केले आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली,

आंदोलन आणि संभांना परवानगी नसल्याचं मुंबई पोलिसांकडून आदेशात म्हटलं आहे. दरम्यान मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे आणि वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला आहे.

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगे झेंडे हातात घेऊन एमआयएम वाहनांची रॅली राज्यभरातून मुंबई काढणार आहे.

मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करत एमआयएमची तिरंगा यात्रा मुंबईसाठी रवाना झाली आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून वाहने थेट मुंबईत येतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

Ahmednagarlive24 Office