कोपरगाव मतदारसंघात प्रत्येक विधानसभेची निवडणूक ही पाण्याच्या प्रश्नावर लढली जाते. यंदाच्या निवडणुकीत आमदार स्नेहलता कोल्हे या मैदानात असतीलच. परंतु प्रमुख विरोधक राष्ट्रवादीचे आशुतोष काळे असले तरी वहाडणेंची भूमिका महत्त्वाची ठरेल. नगराध्यक्ष विजय वहाडणे विधानसभा लढवू शकतात त्यांना शिवसेनेचा छुपा पाठिंबा अपेक्षित आहे.
कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर मध्यंतरी भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्यात पाच नंबरच्या साठवण तलावावरून आरोप-प्रत्यारोप झाले.
शहराच्या दृष्टिने कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटावा म्हणून आमदार कोल्हे यांनी निळवंडे पाइपलाइनचा प्रश्न धसास लावला. त्याला काळे-वहाडणेंनी तीव्र विरोध केला, तर साठवण तलावाच्या प्रश्नात काळे-वहाडणेंनी प्रश्न उचलून धरला, तर आमदार कोल्हेंनी त्यात रस घेतला नसल्याचे चित्र बघावयास मिळाले.
हे असू शकतात संभाव्य उमेदवार
भाजपकडून विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उमेदवारी फायनल आहे. राष्ट्रवादीतर्फे आशुतोष काळे, भाजपतर्फे नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेश परजणे, सेनेकडून प्रमोद लबडे, नितीन औताडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, मनसेतर्फे अलिम शहा यांना तिकीट मिळू शकते.
पाहुयात २०१४ मधील विधानसभेची स्थिती
भाजपच्या आ. स्नेहलता कोल्हे ९९,७६३ मिळवत आमदारकी मिळवली होती
तर राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांना ७०,४९३ मते मिळाली होती शिवसेने कडून निवडणूक लढलेले नितीन औताडे यांना १९,५८६ मते मिळाली होती.
२०१९ : लोकसभा निकाल
शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांनी ह्या तालुक्यातून ८८ हजार ६४३ मते मिळविली होती
तर काँग्रेसचे आ.भाऊसाहेब कांबळे यांना ४९ हजार ३४४ मते मिळाली होती
हे ठरू शकतात प्रचारातील मुद्दे
कोपरगाव मतदारसंघात निळवंडे पाणी पुरवठा पाइपलाइनचा मुद्दा, एमआयडीसी, तालुक्यासह शहरातील रस्त्यांचा प्रश्न, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न, सत्तेतील हिस्सेदार कोल्हे व वहाडणें असूनही कोपरगाव तालुक्याची झालेली परवड अशा अनेक समस्या आहेत यंदाची निवडणूक याच प्रश्नावर होईल.