अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- वीज वितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांना देण्यात आलेल्या सरसकट बिलांची होळी आणि राज्य सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रूक येथे आंदोलन करण्यात आले.
वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरसकट वीज बील पाठवून महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांना ‘शॉक’ दिला आहे.
तिजोरीत पैसा नसताना केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा सुरु आहेत. बिघाडी सरकारच्या फसव्या धोरणाचीच होळी रस्त्यावर उतरुन करण्याची वेळ आली आहे.
घोषणाबाज सरकारचा फ्युजही आता उडाला असल्याची तिरकस टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते काशिनाथ विखे, एम. वाय. विखे, किसन विखे, अध्यक्ष नंदू राठी, सुभाष विखे, संचालक संजय आहेर, सिनेट सदस्य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे,
माजी उपसरपंच अनिल विखे, रावसाहेब साबळे, अशोक धावणे, विक्रांत विखे, खंडू धावणे, संतोष विखे, अनिल विखे, शंकर विखे यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सरकारच्या धोरणावर टीका करताना आमदार विखे म्हणाले,लोकप्रियतेसाठी महाविकास आघाडीकडून केवळ घोषणा आणि आश्वासने दिली जात आहेत.
ऊर्जामंत्र्यांनीच स्वत:च्या घोषणेपासून पळ काढला आहे. या घोषणेची पूर्तता करुन तातडीने 100 यूनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचा आग्रह सरकारकडे आम्ही धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved