विखे पाटील म्हणाले मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर नव्हते !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते,न्यायालयात भूमिका मांडताना झालेल्या गंभीर चुकांमुळेच मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचा आरोप माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 

माध्यमांशी बोलताना आ विखे पाटील म्हणाले  की  सकल मराठा समाजाच्या राज्यात निघालेल्या ५३ मोर्चाच्या संघटीत शक्तीने आरक्षणाच्या मागणीला खरी ताकद मिळाली.यासाठी अनेकांचे बलीदान झाले.

यासर्व सामाजिक एकजुटीचा विजय आरक्षणाच्या निर्णयात झाल्याकडे लक्ष वेधून आ विखे पाटील म्हणाले की मिळालेले आरक्षण कायमस्वरुपी टिकावे म्हणून ज्या गांभीर्याने महाविकास आघाडी सरकारने निर्णय करायला हवे होते ते न झाल्यानेच न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडण्यात सरकार कमी पडले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

कंगानाच्या वक्तव्याच समर्थन नाही,पण आपले अपयश झाकण्यासाठीच कंगनाच्या विषयाला मोठे करून महाविकास आघाडी सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे.

मुंबई महानगर पालिकेने जेवढी तत्परता कंगनाचे कार्यालय तोडण्यासाठी दाखवली तेवढी  तत्परता नाले सफाईच्या वेळी का दाखवली नाही असा  सवाल विखे पाटील यांनी उपस्थीत केला. पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या अर्थिक संकटाला सामोरे जावे लागले  आहे.

अधिवेशनात काही  घोषणा होतील आशी  अपेक्षा होती परंतू अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलीच.राज्यात दूध उत्पादक आणि  शेतकरी मोठ्या अडचणीत असून सरकारने अधिक वेळ न दडवता मदत जाहीर करण्याची मागणी आ.विखे पाटील यांनी केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24