अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना मोठा फटका बसला आहे. दिग्गज आमदारांचा पराभव झाला, या घटनेनंतर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात उफाळून आला.
आज या संदर्भात पक्षात वाढलेल्या नाराजीवर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.
राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे आदी नेते बैठकीला उपस्थित होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला .
राम शिंदेंसह शिवाजी कर्डिले यांनी विखेंविरूद्ध तक्रारी केल्या. माजी मंत्री राम शिंद आणि शिवाजी कर्डिले यांनी पराभवासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांना जबाबदार धरले.
विधानसभा निवडणुकीत विखे पाटीलांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केलं असा राम शिंदे यांचा आक्षेप आहे. भाषणात समोरच्या उमेदवाराला मदत होईल अशी वक्तव्य त्यांनी केलीत.
भाषणात विरोध घडाळ्याला, उमेदवाराला नाही असं विखेंनी म्हटलंय. विखे पाटीलांचे कार्यकर्ते प्रचारावेळी राम शिंदेंच्या व्यासपीठावर पण सुजय विखे आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या बाजुने मदतीला होते.
शिंदे विरोधकांच्या ऐन निवडणुकी दरम्यान भेटीगाठी घेणं यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे, त्यातून शिंदेंच्या मतांवर परिणाम झाला.
भाजपात प्रवेश घेतल्यानंतही पक्षात न मिसळता स्वत:चा वेगळा गट करत कंपूशाही करणं आणि शिंदे यांचा पराभव होईल अशी व्यवस्था करणं. अशी कारणे राम शिंदे यांनी सांगितली.