एकमेकांवर शाब्दिक हल्ले करणारे विखे आणि थोरात आले एकत्र पण…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :-  काँग्रेसमध्ये एकत्र असताना विखे आणि थोरात यांच्यामध्ये अनेकदा वैर पाहायला मिळालं. त्यांनतर विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकमेकांवर टीका करण्याची हे दोघे एकही संधी सोडत नाहीत.गेल्या दोन दिवसांपासून ह्या दोन्ही नेत्यांत जोरदार शाब्दिक युध्द सुरु आहे. 

मात्र शनिवारी एका लग्नसमारंभात विखे-थोरात एकमेकांशेजारी बसलेले दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. विखे आणि थोरात चक्क एकमेकांच्या शेजारी एकाच सोफ्यावर बसले. तसेच ते एकमेकांशी हसतखेळत चर्चाही करत होते.

संगमनेरमधील एका विवाह सोहळ्यानिमित्त महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एकत्र आले होते एकमेकांवर टीका करणार्या ह्या दोन्ही नेत्यांनी विवाह सोहळ्यात एकाच सोफ्यावर बसत चर्चाही केली.

काल (२८ डिसेंबर) दिवसभरात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्याचवेळी बाळासाहेब थोरात आणि विखे हे दोघे संगमनेर तालुक्यातील नामदेव गुंजाळ यांच्या मुलीच्या विवाह सभारंभासाठी हजर होते. दोन्ही नेते एकाच वेळी दाखल झाले आणि बाळासाहेब थोरात यांनी चक्क राधाकृष्ण विखे यांना शेजारी बसवून घेतले.

हे दोन्ही नेते एकाच सोफ्यावर बसले असून या दोघांमध्ये चर्चा ही झाल्याचे पाहायला मिळले. मात्र, या दोघांमध्ये नेमक्या काय चर्चा झाल्या हे जाणून घेण्यास सर्वचण उत्सुक आहेत. मात्र याबबत बोलण्यास दोन्ही नेत्यांनी नकार दिला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24