Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Vivo Upcoming Smartphone : विवो चाहत्यांसाठी खुशखबर ! कंपनी 11 एप्रिलला लॉन्च करणार तगडा स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स, किंमत

विवो बाजारात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन कंपनी 11 एप्रिलला लॉन्च करणार आहे.

Vivo Upcoming Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण Vivo कंपनी बाजारात नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार Vivo T-Series डिव्हाइसला Vivo T2 5G म्हणून डब केले जाईल आणि त्यात Vivo T2 5G आणि Vivo T2x 5G या दोन उपकरणांचा समावेश असेल.

दरम्यान, फ्लिपकार्टने मायक्रोसाइटमध्ये स्मार्टफोनच्या खास वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे. सध्या कंपनीने आगामी फोनचा लूक टीज केला आहे. नवीन फोन स्नॅपड्रॅगन चिपसेटने सुसज्ज असेल.

हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट कंपनी, विवो वेबसाइट आणि देशभरातील मर्यादित रिटेलर स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. सीरिजच्या अधिकृत टीझरमध्ये मॉडेल्स निळ्या आणि सोनेरी रंगामध्ये दिसत आहेत.

क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

आगामी स्मार्टफोन्सना फुल एचडी + एमोलेड स्क्रीन मिळेल, 1300 निट्सच्या पीक ब्राइटनेससह, 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन SoCs चालेल. कंपनीने स्पष्ट केले आहे की 7 एप्रिल रोजी डिव्हाइसचा कॅमेरा स्पेसिफिकेशन आणि 9 एप्रिल रोजी प्रोसेसर बद्दल माहिती देणार आहे.

ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइज़ेशन

बेस Vivo T2 5G प्रकारात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 64-मेगापिक्सेल रीअर प्राइमरी लेन्स असण्याची अपेक्षा आहे आणि भारतात त्याची किंमत 20,000 रुपये असेल. हा फोन 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजचा समावेश असलेल्या दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

Vivo T1 5G गेल्या वर्षी आला होता

याआधी कंपनीने स्नॅपड्रॅगन 695 SoC वर चालणारा Vivo T1 5G स्मार्टफोन भारतात फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च केला होता. Vivo T1 5G च्या बेस 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,990 रुपये आहे आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.