राहुरी तालुक्यातील हजारो एकरांवरील खरिप पिकांवर पाणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या पाऊस सर्वत्र जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतील खरीप पिकांवर पाणी फेरले गेले आहे.

मागील काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे राहुरी तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी, चेडगाव, मोकळ ओहळ, पिंप्री अवघड, सडे, कुक्कडवेढे, वांबोरी परिसरात अनेक शेतकर्‍यांची सोयाबीन, घास, डाळिंब, कपाशी, उसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे.

यात खरिपाच्या पिकांसह गळिताला आलेल्या उसाच्या फडाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने शिवारातील ऊस पिके पडल्याने नुकसान झाले आहे.

साखर कारखाने सुरू होण्यास थोडासा अवधी असून त्यानंतर लागवड तारखेप्रमाणे नंबर येण्यास किती महिन्यांचा अवधी जाणार हे सांगता येत नाही. पडलेली ऊस पिके पुन्हा उभी राहणे शक्य नाही.

त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर यांनी केली आहे.

मागील आठवड्यात या परिसरात वादळवार्‍यासह सलग तीन दिवस पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील तलाव आणि बंधारे तुडूंब भरले असून विहिरी आणि कुपनलिकांची पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे.

एकीकडे पाण्याची पातळी वाढत असताना शेतकरी खुशीत असले तरी उसाचे पीक जमीनदोस्त झाल्याने व कपाशीच्या शेतात पाणी साचून ही पिके सडून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.

या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.

त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24