अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जून महिन्यापासूनच राज्यात दमदार मान्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे बहुतांश धरणांची पाणी पातळी वाढलेली आहे.
गेल्या तीन-चार दिवसापासून नगर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील मुख्य धारण साठ्यात वाढ झाली आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस कोसळत असल्याने धरणातील पाणीपातळी वाढली आहे. ११ टीएमसी क्षमतेच्या या भंडारदरा धरणात सध्या ९.६० टीएमसी पाणी असून, पाऊस सतत सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी राखण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले गेले आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी धरणाची पाणीपातळी ९४२ मीटर झाल्याने व पाणीसाठा ९६०६ दशलक्ष घनमीटर (९.६० टीएमसी) झाल्याने तसेच पावसाची संततधार सुरूच असल्याने
प्रवरा नदीपात्रात ८३५ क्युसेक्स वेगाने पाणी सोडले गेले. प्रवरा नदीकाठची गावे, वस्त्या, वाड्यांतील नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणीही नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागाद्वारे करण्यात आले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved