महाराष्ट्र

Pune Tourism News : पुणे जिल्ह्यात जिल्ह्यात पर्यटनाला जातायं.. सावधान ही बातमी वाचा मग ठरवा !

Published by
Ahmednagarlive24 Office

Pune Tourism News : पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी विविध ठिकाणे प्रसिध्द आहेत सध्या पर्यटनस्थळावर प्रचंड गर्दी होवून पर्यटक पर्यटनाचा मनमुराद आनंद लूटत आहेत. चोहोबाजूंनी डोंगरदऱ्या, हिरवेहिरवे प्रचंड दाट झाडी असल्याने या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते.

मात्र या स्थळावर आपण जात असाल तर जरा सावधान..! कारण अतिउत्साह आपल्या किंवा आपली एखादी चूक आयुष्यासाठी हानीकारक ठरू शकते. पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना स्थानिक नागरिकांची मदत घेणे खूप गरजेचे असते.

सह्याद्रीच्या कुशीत अशा अनेक अनोळखी नाले, नद्या आणि दन्या आहेत, त्या नवीन पर्यटकांना माहिती नसतात. त्यामुळे अनेक दुर्दैवी घडत असतात. त्याचबरोबर रस्त्याने जातानासुद्धा दरड कोसळण्याचे प्रकार घडतात.

त्यामुळे पर्यटकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. मावळातील धबधब्याला भेट दिल्यानंतर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत होतो. परंतु डोंगर दऱ्या, पाण्यापासून सावध राहणे या गोष्टींकडे केल्सा पर्यटकांचा दुर्लक्ष हा आनंद क्षणिक ठरू शकतो.

जीवाला हानी पोहोचविणारा ठरू शकतो. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना सावधान करणे आता गरजेचे झाले आहे. कारण नाणे मावळातील कुंडमळ्यात एक तरुण पाण्यात वाहून गेला. तर जुन्नर तालुक्यातील माळशेज भागातही एका पर्यटकाचा हाकनाक बळी गेला आहे.

येथील कुंडमळा येथे वर्षाविहारासाठी आलेला ओंकार गायकवाड (वय २१, रा. चाकण, ता. खेड, मूळगाव पारनेर, नगर) हा युवक पाण्यात वाहून गेला. ही घटना शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी घडली. ओंकार हा पिंपरी टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होता.

पावसाळ्यात कुंडमळा या पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, सेल्फी काढण्याच्या नादात येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. ओंकारही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात पडून वाहून गेला.

तळेगाव एम. आय. डी. सी. पोलिस व मावळ वन्यजीव रक्षक पथक तसेच कुंडजाई मित्र मंडळ दिवसभर शोध घेत आहेत. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ असलेल्या काळू वॉटरफॉल येथे ही घटना घडल्याची माहिती समोर आली असून एका ओढ्यामध्ये पाण्याचा जोर वाढल्यामुळे पर्यटकांना परत येण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता.

तर तेथील स्थानिक लोकांकडून या पर्यटकांना मदत करण्यात आली. पण मदत करणारा एक तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाहून गेलेला तरूण सुखरूप असल्याची माहिती आहे. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून ट्रेकिंगला जाताना असा खोडसाळपणा करणे किंवा अति शहाणपणा करणे टाळले पाहिजे असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Ahmednagarlive24 Office