आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले.

त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासियांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल,

असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार खिल्ली समाजमाध्यमातून उडवली जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24