अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाबद्दल वक्तव्य केले होते.
या वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचे सत्र सुरु झाले आहे. त्यावरून आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chatrapati Shivaji Maharaj) हिंदूंची व्होटबँक तयार केली.
त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली होती त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, मी म्हणालो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक (Hindu Vote Bank) तयार केली. त्याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केले.
त्यात चुकीचे काय? याच वक्तव्याला घेऊन कुणीतरी निदर्शने करणार होती. मला धमकी आली, मात्र, हम किसीको टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची आणि हिंदू धर्माची पूजा केली.
कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो, असे नवीन वक्तव्यही पाटील यांनी केले आहे. पाटील यांच्या बेधडक वक्तव्य आणि वादाची मालिका सुरुच आहे. त्यातच आता पाटील यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.