धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेऊ – शरद पवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.

याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मुंडे हे बुधवारी मला भेटले. यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली.

त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना त्यांना होती.

त्यामुळेच मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही.

परंतु मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांशी माझं अद्याप बोलणं झालेलं नाही.

मात्र, मी त्यांना विश्वासात घेऊन मुंडे यांनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यासाठी फार वेळ लागणार नाही. असेही ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24