राज्यातील या जिल्ह्यांत पावसाची शक्यता,वाचा हवामान खात्याचा अंदाज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिवाळा चालू असताना राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.थंडीचा पारा घसरून येत्या आठवड्यात विदर्भात काही भागांत विजेच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. 

येत्या 24 तासांत नागपूर, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ, बीड आणि नांदेड या शहरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे.

महाराष्ट्रामध्ये हवामानात मोठे बदल होताना पाहायला मिळणार आहे. येथे विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात काही भागात पुढील 24 तासांत हलक्या सरी आणि गडगडाटी पाऊस पडेल.

राज्यातील नागपूर, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ, बीड आणि नांदेड या शहरांना प्रामुख्याने या पावसाचा फटका बसणार आहे.तर मुंबईसह अन्य भागात मात्र ढगाळ वातावरण कायम राहील असेही सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रामध्ये हवामानात मोठे बदल होताना पाहायला मिळणार आहे. येथे विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात काही भागात पुढील 24 तासांत हलक्या सरी आणि गडगडाटी पाऊस पडेल.

राज्यातील नागपूर, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ, बीड आणि नांदेड या शहरांना प्रामुख्याने या पावसाचा फटका बसणार आहे.महाराष्ट्राच्या उत्तरी भागात, येत्या 24 तास तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यासह बहुतांश भागात आकाश ढगाळ असेल.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24