महाराष्ट्र

Weekend Trip: ‘हा’ विकेंड तुमच्या जोडीदार किंवा मित्रांसोबत बनवा खास! नाशिक जिल्ह्यातील ही ठिकाणे पहाल तर मंत्रमुग्ध व्हाल

Published by
Ajay Patil

Weekend Trip:- दररोजच्या जीवनामध्ये आपण तोच तोच रुटीन किंवा त्याच त्याच टायमिंगला नोकरीच्या ठिकाणी जाणे आणि त्याच टाइमिंगला घरी येणे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाणे ह्या ज्या काही दररोजच्या गोष्टी एका ठराविक वेळेत करत असतो आणि त्याच त्याच गोष्टींमुळे आपण आपले दैनंदिन जीवन किंवा जीवनातील जे काही एक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जगण्याचे काही क्षण असतात ते आपण हरवून बसतो.

त्यामुळे या सगळ्या कंटाळवाण्या रुटीनमधून जरा दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यामध्ये कुटुंब किंवा मित्र किंवा जोडीदारासोबत वेळ घालून स्वतःला चार्ज करणे खूप गरजेचे असते.त्यामुळे या दररोजच्या तोच तोच रुटीन मधून जरा बाहेर पडून निसर्ग समृद्ध अशा ठिकाणी भेट देण्याची प्लॅनिंग बरेच जण बनवतात व अशा प्लॅनिंग वीकेंडच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातात.

याच प्रमाणे तुमचा देखील या वीकेंडमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदार किंवा मित्रांसोबत कुठे ट्रीप प्लान करण्याचे प्लॅनिंग असेल तर तुम्ही नाशिक जिल्ह्याची निवड यासाठी करू शकतात. नाशिक जिल्ह्यामध्ये अशी अनेक निसर्गाने समृद्ध असलेली ठिकाणे आहेत की ती तुम्हाला फ्रेश करू शकतील आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनमोल असा आनंद देऊ शकतील.

 जोडीदार किंवा मित्रांसोबत नाशिक जिल्ह्यातील या ठिकाणांना द्या भेट

1- सोमेश्वर धबधबा सोमेश्वर धबधब्याला दूध सागर धबधबा म्हणून देखील संबोधले जाते व त्याची ओळख या दोन्ही नावांनी होते. नाशिक मधील हा एक प्रसिद्ध धबधबा असून पावसाळ्याच्या कालावधीमध्ये याचे सौंदर्य अधिकच सुंदर आणि खुलून दिसते. या धबधब्याच्या आजूबाजूला हिरवाई पसरलेली असून नाशिक शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.

त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सोमेश्वर धबधब्याला भेट देऊ शकता व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  भगवान शिवाचे सोमेश्वर मंदिर या ठिकाणी आहे.तसेच बालाजी मंदिर देखील आहे. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर ही जागा तुमच्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे.

2- पांडवलेणी तुम्ही तुमचे मित्र किंवा तुमच्या जोडीदारासोबत या वीकेंडला कुठे जायचा प्लॅन करत असाल तर नाशिक जिल्ह्यातील पांडव लेणी हा पर्याय तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. पांडवलेणीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्राचीन आणि नैसर्गिक रित्या तयार झालेल्या असून या लेण्यांचा संबंध महाभारतातील पांडवांशी आहे.

त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या बघितल्या तर या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. पांडवलेणी त्यांच्या वास्तू आणि त्यांची अंतर्गत रचना जर तुम्ही बघितली तर तुम्ही त्यावेळच्या कला आणि इतिहासाच्या अक्षरशा प्रेमात पडतात.

या ठिकाणी असलेल्या गुहे बद्दल तुम्हाला खूप काही माहिती करून घेण्याची संधी देखील मिळते. नाशिकमध्ये त्रिरश्मी टेकडीवर बांधलेल्या या लेण्या असून या ठिकाणी तुम्ही नाशिक ते मुंबई रोडने म्हणजेच महामार्ग 3 ने जाऊ शकतात.

Ajay Patil