अहमदनगरच्या वाट्याला मिळाली वजनदार खाती !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाविकास आघाडी सरकार मध्ये नगर जिल्ह्याच्या वाट्याला वजनदार खाती मिळाली आहेत.राज्य काँग्रेसचे मातब्बर नेते ना. बाळासाहेब थोरातांकडे महसूल खाते शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांना जलसंधारण तर राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे ऊर्जा व नगरविकास ही खात्यांचा कारभार मिळाला आहे.

ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खाते येणार मिळाले आहे, ना.थोरात यांनी यापूर्वीही महसूलमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा राज्याच्या प्रशासनावर पकड ठेवणारे हे खाते पुन्हा त्यांच्याकडे आले.

ना.शंकरराव गडाख यांनाही दुष्काळी स्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे जलसंधारण खाते मिळाले. विशेष म्हणजे ना.गडाख यांनी 2009 ते 2014 या काळात आमदार म्हणून नेवासा मतदारसंघात जलसंधारणाचा गडाख पॅटर्न यशस्वी करून दाखविला होता. त्यांची आवड आणि अभ्यास असलेल्या विषयाचे तसेच शेतकर्‍यांच्या दृष्टीने जबाबदारीचे खाते मिळाल्याने त्यांचे समर्थक आनंदात आहेत.

ना.प्राजक्त तनपुरे यांनाही नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन ही खाती मिळाली आहेत, विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्र्यांनाही निर्णयाचे विशेष अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये राज्यमंत्रीही पावरफुल ठरणार आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24