कळसुबाई शिखरावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी कळसुबाई शिखरावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. पूर्वसंध्येला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून शिखरावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.

दरवर्षी प्रमाणे कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी कळसुबाई शिखरावर पहाटेच चढाई करून सूर्योदय वेळी कळसुबाई मातेचा अभिषेक व आरती करून गुढीचे पूजन केले व राज्यातील सर्वोच्च शिखरावर मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

या वेळी करोना नावाच्या राक्षसाचा वध करून मानवाला ह्या महामारीतून मुक्त करून सर्वाना हिंदू नूतन वर्ष सुखाचे ,आनंदाचे,आरोग्यदायी जाऊ दे अशी कळसूबाई मातेला गिर्यारोहकांनी साकडे घातले.

गिर्यारोहकांनी मास्क घालून, सामाजिक अंतर ठेवून, सॅनिटायझरचा वापर करून शासनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24