अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरजवळ असलेल्या केसापूर येथील दाम्पत्य मुलासह मुंबईतील विवाह समारंभासाठी गेले होते. खैरी येथील युवती अस्तगाव येथे लग्नाला गेली होती. येताना ते कोरोना घेऊन आले.
कोरोना लग्नाच्या माध्यमातून प्रवास करतो हे लक्षात आले असूनही नियम धाब्यावर बसवून लग्नांचा धुमधडाका सुरूच आहे. मागील आठवड्यात २३ वर्षीय युवतीसह अनेकजण लग्नासाठी अस्तगावला गेले होते.
सोमवारी या युवतीला सर्दी, ताप, खोकला येऊ लागल्याने ती खैरी येथील दवाखान्यात गेली. डॉ. रमेश धापटे यांना शंका आल्याने त्यांनी तिला नगरला पाठवले.
तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या १२ झाली आहे. तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.
संबंधितांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केले आहे.
बेलापूरशी दैनंदिन संबंध असणाऱ्या राहुरी तालुक्यातील केसापूर गावातही तीनजण पॉझिटिव्ह आल्याने बेलापूर, केसापूर व आंबी परिसरात खळबळ उडाली आहे. हे तिघेही लग्नासाठी मुंबईला गेले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews