महाराष्ट्र

‘काय झाडी..’वाल्या शहाजीबापूंवर कोसळले मोठे संकट, पण…

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद’, या एका डॉयलॉगमुळे प्रसिदधीच्या झोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर मुंबईत मोठे संकट कोसळले होते.

मात्र, त्यातून ते थोडक्यात बचावले.मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील आमदार पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. त्यावेळी आपल्या रूममध्येच होते.

रूममधील बेडवर सिलिंगचा मोठा भाग कोसळला आहे. यातून पाटील थोडक्यात बचावले आहेत. यावर पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. ते सुरक्षित आणि सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. निसर्गरम्या अलीशान हॉटेलमध्ये काही दिवस घालविल्यानंतर मुंबईतील आमदार निवासात आल्यावर त्यांना या प्रसंगाला सामोरे जावे लागले.

Ahmednagarlive24 Office