अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकीतएका मताने विजय मिळवल्याची दुर्मिळ घटना शिरगुप्पी ग्रामपंचायतीत घडली आहे.
ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतमोजणीवेळी शिरगुप्पी ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभाग 2 मधील अपक्ष उमेदवार शंकर मधुकर चव्हाण यांनी एका मताने विजय प्राप्त करीत करिष्मा दाखवून दिला.
चव्हाण यांना 173 तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसपुरस्कृत उमेदवार अमोल कांबळे यांना 172 मते मिळाली. त्यामुळे चव्हाण यांच्या विजयाची चर्चा दिवसभर मतमोजणी केंद्रावर होती.
सार्वत्रिक निवडणुकीवेळी अनेकदा असंख्य उमेदवार, कार्यकर्त्यांना एका मताने काय फरक पडतो? असे वाटते. पन त्याचा मताने यावेळी उमेदवार निवडून आला आहे.मात्र एका मताने विजय झाल्याचा आणि एका मताने पराभूत झाल्याचा अनुभव काय असतो? हे चव्हाण व कांबळे यांच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.
शिरगुप्पी येथील निवडणुकीत एका मतावरून चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. शिरगुप्पी येथे भाजप व कॉंग्रेसपुरस्कृत उमेदवारांनी विजयासाठी कंबर कसली होती.
त्यामुळे स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, अपक्ष उमेदवार चव्हाण असा करिष्मा दाखवतील, असे वाटले नव्हते.
मतमोजणीवेळी बराचवेळ चव्हाण व कांबळे यांच्यात कॉंटे की टक्कर सुरु असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढत होती. अखेर एका मताने विजयी झाल्याचा दिलासा चव्हाण यांना मिळाला.