पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

“मला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी राज्यामध्ये स्थिर सरकार देण्यासाठी पुढाकार घेत भाजपाबरोबर येण्याचा निर्णय घेतला.

इतरही काही नेते आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे,” असं फडणवीस यांनी एनएनआयशी बोलताना म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरिही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली.

त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थीर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला.

राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थीर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहू.”

अहमदनगर लाईव्ह 24