अहमदनगर Live24 ,6 जून 2020 / नाशिक : पाच दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोरोना संशयित रुग्णाचा रीतिरिवाजानुसार अंत्यविधी केल्याने आणखी सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी पंचवटीत उघडकीस आला.
दरम्यान, जिल्ह्यात 36 रुग्णांची भर पडली असून, यात नाशिक शहरातील 21, मालेगावचे पाच आणि उर्वरित जिल्ह्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.
पंचवटीच्या स्नेहनगर येथील 56 वर्षिय कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाकडून मृतदेह प्लॅस्टिक कव्हरमधून नातलगांच्या स्वाधीन केला गेला.
त्यावेळी विद्युत दाहिनीमध्ये अंत्यविधी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. परंतु, नातलगांनी कव्हर काढून मृतदेहास अंघोळ घातली. रीतिरिवाजानुसार अंत्यविधी करण्यात आला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित मृत रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या पथकाने स्नेहनगरमधील त्यांचे घर गाठले आणि कुटुंबीयांतील सदस्यांना ताब्यात घेत त्यांचे स्वॅब घेतले. या कुटुंबातील सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews