अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- क्वारंटाईन करण्यात आलेल्या महिलेचे दागिने विलगीकरण कक्षातून चोरीला गेले. नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे घटना घडली.हा गुन्हा काल रात्री साडेदहा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मुंबई, पुणे आदी भागातून नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून परजिल्ह्यातून नगर जिल्ह्यात येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येत आहे.
त्यानुसारच घाटकोपर येथून राळेगण म्हसोबा येथे आलेल्या एका महिलेला देखील गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते.
मात्र, या महिलेचे मंगळसूत्र, नेकलेस, नथ, कानातील झुबे, असे जवळपास ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे.
याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com